चिंचवड, 19 फेब्रुवारी: क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एजुकेशन फॉउंडेशन संचालित न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने अखिल रहाटणीगाव शिवजयंती उत्सव २०२५ आयोजित.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला काळेवाडी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, संस्थेचे संथापक अरुण चाबुकस्वार, युवा महाराष्ट्र केसरी पहिलवान किशोर नखाते, मा.पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, युवा नेते शुभम नखाते, पि.चि.म.न.पा महापौर केसरी निलेश नखाते या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रूपाली सोंडे, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, असंख्य शिवभक्त उपस्थित होते. शाळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रहाटणी अशी जय शिवाजी जय भारत ह्या नावाने पदयात्रा काढण्यात आली. “छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्माचे मावळे एकत्र करून धर्मनिरपेक्ष स्वराज्य निर्माण केले, महाराजांच्या जीवनकार्याची तसेच शिवरायांची लोककल्याणकारी अर्थव्यवस्था, सामान्याचे सक्षमीकरण” याविषयी अरुण चाबुकस्वार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सातवीच्या विद्यार्थ्यांनी पोवाड्यांचे सादरीकरण केले. शिवगीत आठवीच्या मुलींनी गायले. शिवगर्जना सोहम गायकवाड आणि समर काळे, यांनी सादरीकरण केले. राजमुद्रा सार्थक ननवरे यांनी सादर केली. प्रज्ञा शिरोडकर गीतांजली दुबे आणि उर्मिला ठोंबरे यांनी इंग्रजी हिंदी आणि मराठीत भाषण केले.सूत्रसंचालन स्वाती वक्ते यांनी तर भावना देवरे यांनी आभार मानले