पिंपरी, 21 जुलै: ऑल इंडिया धनगर समाज महासंघ (दिल्ली) व श्रीमंत राजे मल्हारराव होळकर ट्रस्ट पिंपरी चिंचवडच्या वतीने ‘गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा’ कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 9 वा गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा पार पडला. धनगर समाजातील 173 विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ नितीन वाघमोडे आयकर आयुक्त पुणे, व डॉ शशिकांत तरंगे अध्यक्ष धनगर ऐक्य परिषद हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण काकडे महाराष्ट्रप्रदेश अध्यक्ष, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ (दिल्ली) हे होते. आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार अमित गोरखे यांनी उपस्थितांना संबोधित केले. प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण गोफने मुख्य आरोग्य अधिकारी पिंपरी चिंचवड आणि हनुमंत दुधाळ (उपाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ)हे उपस्थित होते.
समाजातील विद्यार्थ्यांसाठी शहरामध्ये वसतिगृह आणि अभ्यासिका असावी अशी मागणीही आमदार शंकर जगताप यांना समाजाच्या वतीने यशोदा नाईकवाडे यांनी केली. यावेळी शहरातील विद्यार्थी, पालक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.
यामध्ये शहर अध्यक्ष महावीर काळे, मराठवाडा विभाग अध्यक्ष सुनील बनसोडे, पुणे जिल्हा अध्यक्ष संजय नाईकवाडे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष हिरकांत गाडेकर, शहरयुवक अध्यक्ष संतोष पांढरे,शहर कार्याध्यक्ष संजय कवितके,शहर सचिव नवनाथ देवकाते, महिला अध्यक्ष सोनताई गडदे,उपाध्यक्ष बाळासाहेब यमगर, बाळासाहेब कारंडे, शंकर दातीर, कृष्णराव टकले,दिलीप गडदे,यशोदा नाईकवाडे, सचिन शिंदे, दादा दोलतोडे, तानाजी ढाळे,पल्लवी मारकड, दादाभाऊ होलगुंडे,रोहिदास पोटे,अच्युत लेंगरे, बंडू लोखंडे, हरिभाऊ लबडे यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष महावीर काळे यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश आणि संघटनेच्या मागील 8 वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. वर्षभरात संघटना करत असलेल्या समाजोपयोगी कामाची माहिती दिली.सुत्रसंचालन अजित चौगुले यांनी तर आभार यशोदा नाईकवाडे यांनी मानले.