‘मेट्रोपोलिटन सिटी
‘मेट्रोपोलिटन सिटी

गांव ते मेट्रो सिटी’

गांव ते ‘मेट्रोपोलिटन सिटी’ (महानगर) असा पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीचा झपाट्याने झालेला विकास खरोखरच कोणालाही अचंबित करणारा आहे. कामगारनगरीत राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कामाच्या शोधात व पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या शहराचे नागरीकरण मोठ्या झपाट्याने होत आहे. त्यामुळे देशातील अन्य शहरांच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहराचा लोकसंख्या वाढीचा वेग ७० टक्के जादा आहे. त्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी, मेट्रो, बीआरटी, रिंगरोड, टाऊन प्लॅनींग (टि. पी.) स्किम अशा प्रकल्पांनी वेग घेणे अपेक्षित आहे.

पिंपरी, चिंचवड, आकुर्डी व भोसरी या चार ग्रामपंचायती एकत्र करून ४ मार्च १९७० मध्ये पिंपरी- चिंचवड नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी दिवंगत व माजी उपपंतप्रधान व माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीने या शहरात महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ (एमआयडीसी) ची स्थापना झाली होती. त्यामुळे वाढत्या औद्यगिकरणामुळे कामगारांचे लोंढे या शहरात १९६० च्या दशकातच येऊ लागले.

१९७० मध्ये शासन नियुक्त प्रथम नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहब मगर यांनी केलेल्या विकास कामांमुळे अल्पावधीतच ७ जानेवरी १९७५ मध्ये ही नगरपालिका ‘अ’ वर्गात रुपांतरीत झाली. १९७८ ते १९८२ या काळात लोकनियुक्त प्रथम नगाराध्यक्ष डॉ. श्री. श्री. घारे यांनी शहराचा नियोजनबध्द विकास केला. शहराला एक चेहरा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. उद्योगांमुळे शहरातील व्यावसायिक आवक-जावक मोठ्या प्रमाणात वाढल्याने आपोआप जकात उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होवून आशीयात सर्वात श्रीमंत नगरपालिका होण्याचा मान त्यावेळी मिळाला. परंतु; याचा अपभ्रंश होवून पुढेही पिंपरी-चिंचवड महापालिका आशीया खंडात श्रीमंत असा प्रचार होत गेला.

प्रा. मोरे यांनी शहराला साज शृंगार चढविला

११ ऑक्टोबर १९८२ ला नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाले. १९८२ ते १९८६ हा प्रशासकीय कालावधी होता. १९८६ मध्ये महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात काँग्रेसला यश मिळाले. दिवंगत माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी या शहराला खऱ्या अर्थाने साज शृंगार चढविला. प्रा. मोरे यांनी या शहरात दूरदृष्टीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम), इंदिरा गांधी उद्यान- अप्पू पर, शहराला जोडणारे महत्वाच ७ उड्डाणपूल, तत्कालीन पिंपरी-चिंचवड ( आत्ताचे प्रा. रामकृष्ण मोरे) प्रेक्षागृह, भाटनगर पुनर्वसन प्रकल्प, निगडी येथील मनपा ५७६ कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, मूळ ओटा स्कीम असे मोठे प्रकल्प राबवून खऱ्या अर्थात या शहरांचे ते शिल्पकार झाले.

अजित पवार यांच्या काळात ‘बेस्ट सिटी’

शहाराच्या राजकारणात माजी उपमुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी १९९१ मध्ये बारामती लोकसभा निवडणुकीत निवडून येवून खासदार म्हणून ‘एंट्री’ केली. त्यानंतर महापालिकेत अजित पवार यांनी १९९२ ते २००३ पर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित नेतृत्व करून शहराचा विकास केला. प्रा. मोरे यांच्या निधनानंतर अजित पवार यांनी गेली ११ वर्षे महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून एकहाती नेतृत्व केले आहे. अजित पवार यांनीही दूरदृष्टी ठेवून शहरात अनेक प्रकल्प राबविल्याने शहराला केंद्र सरकारचा ‘बेस्ट सिटी’ पुरस्कार मिळाला होता.

पुणे शहराच्या जवळच असलेल्या या औद्योगीक नगरीला स्वतःची स्वतंत्र ओळख असली तरीही पुणे शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, पारंपारीक व शैक्षणिक अशा सर्वच स्तरातील प्रचंड मोठ्या अशा वलयांमुळे पिंपरी- चिंचवड शहर नेहमीच काहीसे झाकले गेले आहे. त्यामुळेच पुरेशा सुविधा व विकास झालेला असतानाही औद्यागिक नगरीच्या तुलनेत पुण्यातील जागांचे व सदनिकांचे दर तुलनेने जादा आहेत.

विकास कामांचा वेग कायम ठेवऱ्याची जबाबदारी आयुक्त सिंह यांच्यावर

महापालिकेत १९९७ मध्ये १७ गावे नव्याने समाविष्ट झाली.औद्योगीकीकरणामुळे नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या सुमारे १७ लाख ५० हजार आहे. सध्या शहराची लोकसंख्या सुमारे २५ लाखांपुढे पोहोचली आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येबाबत बोलताना महापालिकेचे तत्कालिन आयुक्त शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. याच वेगाने शहराचा विकास व आपली यंत्रणा धावली पाहिजे, अन्यथा हे शहर कोलमडेल. तत्कालीन आयुक्त डॉ. परदेशी यांच्या म्हणण्यात शंभर टक्के तथ्य असून महापालिकेने आता विकास कामे केली असली तरीही भविष्यातही विकास कामांचा हा वेग कायम ठेवण्याची कसरत महापालिकेतील येणाऱ्या सत्ताधारी व आत्ताच्या प्रशासक म्हणजेच आयुक्त शेखर सिंह यांच्यावर आहे. कारण सध्या महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने त्यांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे.भामा आसखेडच्या १६७ एमएलडी पाण्याची नितांत गरज

वाढत्या लोकसंख्येत शहराच्या पाण्याचीही गरज वाढत आहे. पवना धरणाचे ४५० दशलक्ष घन मीटर (एमलडी) सध्या शहराला अपुरे पडत आहे. त्यामुळे पवना धरण १०० टक्के भरुन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची नामुष्की प्रशासनावर येत आहे. आंद्रा पाणी योजनेचे पाणी येत्या काही दिवसात शहराला मिळणार आहे. चिखलीला जलशुध्दीकरण केंद्र झाले असून लवकरच शहराला १०० एमएलडी पाणी मिळणार आहे. भामा आसखेडमधून १६७ एमएलडी पाणी अजून मिळणार आहे. महापालिकेने हे काम तत्परतेने करणे गरजेचे आहे.

आगामी काळात या विकास कामांना गती देण्याची गरज

महापालिकेचे स्मार्ट सिटी, मेट्रो, बीआरटीएस, सफारी पार्क, भामा आसखेड पाणी योजना, २४ तास पाणी पुरवठा, ‘वेस्ट टू एनर्जी’ यासारखे प्रकल्प गीतेने पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र, या स्मार्ट सिटीत फक्त अगोदरच विकसीत झालेल्या पिंपळे गरव, पिंपळे सौदागर या भागाचा समावेश करुन मागील भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी चुकीचा निर्णय घेतला. आता पुढील काळात शहराच्या ज्या भागात विकास झाला नाही तो भाग विकसीत करणे गरजेचे आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *